Bookstruck

श्रीकृष्णाची आरती - निरसुनि देहत्रय अंतरमंदिर...

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

निरसुनि देहत्रय अंतरमंदिरीं ।

महाकारण तेजतुर्या ओंवाळीं ॥

अर्ध मात्रासहित करोनि कूसरी ।

महाराजया तूं सुखनिद्रा करी ॥ १ ॥

जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।

गोपीरमणातूतें करूं शेजारती ॥ धृ. ॥

पुंनाग मोगरे आणिक जुई जाई ।

बकूळ पारिजातक चंपक शेवंती ॥

परिमळद्रव्यें सहित या सुमनावतीं ।

त्यावरि निद्रा करि तूं भुवनत्रयपती । जय देव. ॥ २ ॥

या शेजेवरि निद्रा करि देवदेवा ।

लक्ष्मी करित आहे चरणांची सेवा ॥

सत्यभामा विंझाणा वारितसे बरवा ।

माधवदासास्वामी अभय कर द्यावा ॥ जय देव. ॥ ३ ॥

« PreviousChapter ListNext »