Bookstruck

ऎसीया पायालागी मंगळ आरती ...

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

ऎसीया पायालागी मंगळ आरती करूं ।
कायावाचामनें जीवी दृढ धरूं ॥ धृ. ॥

जपतपतीर्थे जयापायीं मिरविती ॥
संतमुनीवृंद तया सुखलागी ध्याती ॥ १ ॥

शुभाशुभ उभे नमिती कर जोडोनीं ॥
नारद तुंबरादि अखंडजयावे ध्यानी ॥ २ ॥

एका एकीच जडला जनार्दन पायीं ॥
आरती करितां देहभाव हा नाही ॥ ३ ॥

« PreviousChapter ListNext »