Bookstruck

रामचंद्राचीं आरती - काय करुं गे माय आतां कवणा...

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

काय करुं गे माय आतां कवणा ओंवाळूं ॥
जिकडे पाहे तिकडे राजाराम कृपाळूं ॥ धृ. ॥
ओंवाळूं गे माये निजमूर्ति रामा ॥
रामरुपी दुजेपणा न दिसे आम्हां ॥ १ ॥
सुरवर नर वानर अवघा राम सकल ॥
दैत्य निशाचर तेही राम केवळ ॥ २ ॥
त्रैलोक्यस्वरुपें राम संचारला एक ॥
सद‍गुरुकृपे केशवराजी आनंद देख ॥ ३ ॥
« PreviousChapter ListNext »