Bookstruck

रामचंद्राचीं आरती - ऎकावी कथा कानीं राघवाची ,...

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

ऎकावी कथा कानीं राघवाची, माझ्या माधवाची ॥
जेणें भ्रांती हरे सकळही साधकांची ॥ १ ॥
झणी भरी राम आजी गाईला हो ।
डोळे भरुनी राम आजी पाहिला हो ॥ धृ. ॥
रामकृष्ण शिव वाचे आठवा हो ।
ब्रह्मांडनायका ह्र्दयीं साठवा हो ॥झणी. ॥ २ ॥
जन्मा आलिया धन्य तोची दिवस ।
उद्धव चिद्‌घन ह्रदयीं सावकाश ॥झणी भरी॥ ३ ॥
« PreviousChapter ListNext »