Bookstruck

ये दोस्ती हम नही छोडेंगे छोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे

Share on WhatsApp Share on Telegram
Chapter ListNext »

    आज झालेले महाबळेश्वर प्रकरण ऐकले आणि अंगावर काटा आला. खरतर आमचाच दापोलीची ही मंडळी ओळखीची, मैत्री जपण त्यानचा कडुन शिकाव  अस वाटायच त्याना पाहिल्यावर.  पण आम्ही ते कधीच करु शकलो नाही.
    पण ते जातानाही आम्हाला हिच शिकवण देउन गेले. जिंदगी के साथ भी जिंदगीके बाद भी अस म्हणणारी ही मंडळी अजुनही डोळ्यासमोर येतात आणि ये दोस्ती मनात वाजू लागत. खरच मैत्री अशी असावी हेच खर. निस्वार्थ,निस्सीम आणि ज्या मधे साक्षात मृत्युही येऊ नये. अनेक भांडण आणि तेव्हडच प्रेम. खरच आज मनापासुन या दोस्तीला सलाम करावासा वाटतो.
     मरण याव ते अस ज्यात रक्ताची नाही तर आपण निवडलेली माणस आपल्या सोबत असावित. तो दोस्तीचा हात मराणानंतरही हातात असावा, कायम. मी तरी अस मरण हसत हसत पत्करेन. शेवटी एवढच म्हणेन-
       दोस्तो ये जिंदगी दोस्तोके साथ एसे गुजरिये,
       और मोतको एसे गले लगाईये.....

                    मनाली शैलेश जोशी.

Chapter ListNext »