गणेशाचे आगमन....
सुरू झाला गाजावाजा नाचत येणार बाप्पा माझा,
दहा दिवस नुसतीच मजा कारण घरी येणार गणेशराजा,
नाद घुमणार ढोलताशांचा आवाज होणार फटाक्यांचा, वाजणार गाणी गणरायाची आरती होणार गणपती बाप्पाची,
होणार आता सर्वांना आनंद घरात दरवळणार फुलांचा सुगंध,
चौकाचौकात होणार गर्दी
येणार आनंदाला भरती
होणार गरदी पाहण्यास सोहळा गणेशोत्सवाचा नेत्र दीपणार सर्वांचे पाहूण थाट गणरायाचा.