Bookstruck

सत्य आणि मैत्री

Share on WhatsApp Share on Telegram
Chapter List

नक्की वाचा व आपला अभिप्रेत द्या.
रविंद्र पवार Bsw-I
               
                   *राधेय कर्ण*

                लेख
            
               
आपल्या जवळीक असणाऱ्या व्यक्तीला ही उपाधी दिली जाते.
आता यावर प्रश्न असा निर्माण होतो.
की,जवळीकता निर्माण करणारे तर माता-पिता,भाऊ-बहीण,प्रियसी असे अनेक नाते आपल्या डोळ्यासमोरून येऊन जातात.परंतु या नातेसंबंधाच्या पलिकडे अजून एक नातं आहे,
हा जवळीकचा व्यक्ती दुसरा तिसरा कुणी नव्हे,तर याला नातेसंबंध या भाषेत मित्र असे आपण संबोधित करतो.
    आपण बाजारात एखादी वस्तू खरेदी करतांना त्यापुर्वी, क्षणभर
विचार करतो.त्या वस्तुला निरखून लक्षपुर्वक बघतो.ती वस्तु घेण्यासाठी विशेष कारण बघतो.  आणि मगच ती वस्तू खरेदी करतो. 
           शत्रुता करण्यासाठी ही एक छोटस कारण हे पुरेसे असत.
परंतु मित्रता करतांना यापैकी कोणतीही गोष्ट लक्षात येत नाही. व मित्रता करतो.
मग तो मित्र योग्य असो की अयोग्य त्याबद्दल आपला दृष्टीकोण हा सकारात्मक असतो.

मी कर्ण अधीरताचा व राधामातेचा पुत्र

    माझा चंपानगर ते हस्तीनापुर पर्यंतचा प्रवास। हस्तिनापुरात झालेला अपमान,मी शोषलेल्या वेदना, मी सुत पुत्र असल्या कारणाने गुरू द्रोणाचार्यानी शिष्य म्हणुन माझा अस्वीकार केला.मी माझ्या अस्तित्वासाठी हस्तिनापुरात केलेल्या संघर्षाची गाथा
याबद्दल सागांयला गेलो तर अवघी रात्र अपुरी पडेल.

ही गोष्ट आहे त्यावेळेची जेव्हा हस्तिनापुरच्या मैदानात प्रत्येक वीर आपली युद्ध कौशल्ये दाखवून आपला पराक्रम साध्य करत होता.त्या वीरांमध्ये दुर्योधन, भीम,अर्जुन, नकुल,सहदेव, अशी अनेक वीरांची नावे होती.दुर्योधनाने आपल्या गदाच्या एका प्रहाराने मैदानावर पडलेल्या पाषाणाचा चुराडा केला.
भीम ने मल्लयुध्दामध्ये दुःषाषणाला लोळवल डोक्याइतक वर उचलून त्याला दणकन खाली आपटुन त्याच्या छातीवर बसला आपल्या मुष्टिप्रहारांनी यथेछ्च धुतलं.नकुल ने त्याच्या तलवारीच कौशल्य दाखविली तर सहदेवने भाला फेकिच कौशल्ये दाखविले.हे बघुन मैदानात बसलेले लोक चोहीकबाजुंनी त्यांची जयजयकार करत होते टाळ्यांचा गडगडाहाट मैदानात घुमत होती.
अचानक जयघोष होऊ लागला महान धर्नुधर राजकुमार अर्जुन की जय होsss या जयघोषने मैदानात ध्वनी गुंजाळु लागली.
अर्जुनाने गांडीव उचलुन कमानमधुन बाण काढला. क्षणभर मैदानात सुई पडेल तरी आवाज येईल अशी शांतता पसरली.सर्वांच लक्ष अर्जुनाच्या धनुष्याकडे होती.अर्जुनाने असंख्य बाणाने असंख्य लक्ष साधले  फळांची अनेक तुकडे करून दाखविली.टाळ्यांच्या गडगडाहाट ,जयघोष पुन्हा गुंजू लागले शाब्बास पाडंव पुत्रा तुझ्यासारखा धर्नुधर तिन्ही लोकात कुणी नाही असे शब्द द्रोणाचार्य याच्या मुखातून निघत होते,अद्भुत अर्जुना तुझ्याशिवाय हे दुसर कुणीच करणार नाही. सर्व श्रेष्ट धनुर्धर म्हणुन  नीलकमळाची माळा अर्जुनाच्या गळ्यात पडणार तेवढ्यात मी पुर्ण आवेगाने ओरडलो.  थांबा
क्षणभर मैदानात शातंता पसरली लोकांचा जयघोष बंद झाला सर्वांची नजर आता माझ्याकडे वळली होती.सर्वांच्या मनात एकच प्रश्न उमळत होते की कोण आहे हा? मी बसलेल्या वरीष्ठ मान्यवरांना वाकुन नमन केला. नतंर मी माझा मौन तोडला
अर्जुनाने जे-जे केल ते मी पण करून दाखवु शकतो.आणि मी माझी युध्दकौशल्ये दाखविली.व अर्जुनाला ध्वंद युध्दासाठी आव्हान केले यावरून सर्वश्रेष्ठ कोण याचा निकाल लागेल.
मात्र माझ्या सुत पुत्र असल्या कारणाने माझ्यावर शब्दाचे आघात होऊ लागले.

या क्षणात माझ मान उंचावणारा, मला यथ्थोच्चित सन्मान देऊन, अंगप्रदेश देऊन अंगराज बनविणारा ,मला मित्र म्हणुन स्वीकारणारा .

दुर्योधन
कशी फरत फेड करेल मी या उपकाराची म्हणुन मनात एक निश्चय केला . मला न्याय मिळवुन देण्यासाठी सर्वांच्या विरोधात जाऊन माझ्यासोबत उभा असलेला ।दुर्योधनसाठी वेळ आली तर प्राणांची बाजी ही लावु.

दुर्योधन वाईट असताना हि कर्णाने मित्रतेसाठी धर्माची साथ ही सोडली.कर्णाला माहीत होत की या मार्गावर आपला विनाश अटळ आहे.तरी अखेरच्या श्वासापर्यंत तो दुर्योधनासाठी लडला.

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Chapter List