Bookstruck

लिमिटेड होतं तेच बरं होतं .....

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

पूर्वी बहुतांश गोष्टी लिमिटेड होत्या व त्यामुळे आपले आयुष्य किती सुखी होते बघा ..... 


टी.व्ही.वर १-2 channels होती व ती पण लिमिटेड वेळासाठी .... रात्री ठराविक वेळेनंतर बंद व्हायची व घरातील लोकं एकतर झोपायला जायची नाहीतर छान गप्पा मारायची.... 


दोन चाकी वाहनांचे उत्पादन लिमिटेड होते, बुकिंग केल्यावर वर्षा दीड वर्षाने वाहन मिळायचे त्यामुळे रस्त्यावरील वाहनांची संख्या लिमिटेड होती.. प्रवासाचा आनंद मिळायचा .... 


गोडाधोडाचे पदार्थ फक्त सणासुदीला असायचे व ते पण लिमिटेड त्यामुळे स्थूलतेचे प्रमाण कमी होते.....


शाळांमध्ये लिमिटेड अभ्यास असायचा त्यामुळे मुलांना खेळायला वेळ मिळायचा व मुलांची मानसिक व शारीरिक जडण घडण नीट व्ह्यायची... 


बहुतांश ठिकाणी वर्किंग अवर्स लिमिटेड होते, संध्याकाळी ५-६ च्या दरम्यान अफिसेस बंद व्हायची व माणसे वेळीच घरी पोहोचून कुटुंबासाठी वेळ द्यायची......


अशा अजून अनेक गोष्टी आहेत ज्या लिमिटेड होत्या त्यामुळे आपले आयुष्य खूप सुखी होते......

........... पण आता सगळंच अनलिमिटेड झालंय.... आणि त्यामुळे जीवनातील सुख मात्र खूपच लिमिटेड झालंय !!

« PreviousChapter ListNext »