Bookstruck

भारताच्या विविध प्रांतात

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

हा उत्सव भारतात सर्वत्र होतो. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका, पुरी या ठिकाणी तो मोठ्या प्रमाणावर होतो.  ओरिसामध्ये दहीहंडी जत्रा किंवा दहीभंगा जत्रा या दिवशी साजरी केली जाते. गोकुळ अष्टमीच्या दिवशी उपवास करण्याची प्रथा आहे. गुजराथमध्ये 'सातम' म्हणजे सप्तमीच्या दिवशी पैसे लावून किंवा तसेच दिवसभर पत्ते खेळतात. रात्री बारा वाजता पत्ते बंद करून कृष्णजन्माचा उत्सव सुरू करतात.

मध्य प्रदेशात आणि उत्तरी भारताच्या बऱ्याचशा भागात पौर्णिमान्त महिना असलेले पंचांग वापरात असल्याने या दिवशी त्यांची भाद्रपद कृष्ण अष्टमी येते. या दिवशी कित्येकांच्या घरी गोकुळ-वृंदावनाचा देखावा तयार करून जन्मोत्सव साजरा करतात. वैष्णव लोक तर हा दिवस विशेष भक्तीने पाळतात.वृंदावन येथे या दिवशी दोलोत्सव असतो. याच दिवशी कृष्णाच्या आयुष्यातील महत्वाची संकल्पना रासलीला हिचे सादरीकरण केले जाते.

« PreviousChapter ListNext »