विसर
मी तुला आठवाय लागलो हातो, तुला।
विसरन्यागोदर
पण मला गर्दी करू लागले, मी एकटा
दिसल्यावर
गर्दीत तू दिसत न्हवतीस तरी शोधत होतो तुला
तु कुठे आहेस, काय करत आहेस
हे शब्द कोण माझ्या ओठांवरुन पुसत होतं
तुला भेटण्यागोदर ते मला दुर नेत होते
तु फार हसायची, मला बघुन हळूच लाजायची
तुझ्या गालावरची कळी अलगद फुलायची
आता ते सगळं विसरत आहे, या गर्दीत
लोटत जात आहे
तुला प्रेमाचे चार दिवस देवून ते माझं आख्ख
आयुष्य मागत आहेत .....मागुदेत की
मनाला मनाची ओढ.....सुटुदेत की
अंधारलेल्या जीवनात माझ्या, मला कोणीतरी
उजेड बनवत आहे ...मग बनवूदेतना
अंधारात तुला शोधू की उजेडात त्यांना चालाय
लावू
प्रिये....म्हणून तुला शेवटचं आठवायलोय
तुला विसरन्यागोदर