Bookstruck

साहित्यात

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter List

लोकगीत

नागभाऊरायाला नैवेद्य : नागपंचमीच्या गं दिवशी मी गं नेसले हिरवी साडी
नाग भाऊराया मला पाठवितो गं गाडी
नागपंचमीच्या दिवशी मी गं भरीला चुडा
नागा रे भाऊराया तुला नैवेद्य ताजा पेढा
तूच रे रक्षण करी माझा आईच्या गोताचा
नागा रे भाऊराया तुला नैवेद्य कढीचा
नागा रे भाऊराया तुला वहिल्या मी लाह्या
तुझ्या दर्शनाला आल्या शेजारच्या आया बाया
नागा रे भाऊराया तुला नैवेद्य गुळाचा
आता रक्षण करी माझ्या बंधूच्या कुळाचा

चल गं सये वारुळाला ,नागोबाला पूजायाला | ताज्या लाह्या वेचायाला हळदकुंकू व्हायला

या गं य गडयीनी या गं या मैतरणी तेल्या तांबोळीच्या बाई वान्या बामणाच्या बाई

जमूनिया साऱ्याया जनी जावू बाई न्हवणा चल गं सये वारुळाला वारुळाला

भावगीत-

फांद्यावरी बांधिले गं मुलींनी हिंदोळे, पंचमिचा सण आला डोळे माझे ओले (कवी - ग.दि. माडगूळकर; गायक - गजानन वाटवे)

चित्रपटगीत

चल गं सये वारुळाला वारुळाला,नागोबाला पुजायाला पूजायाला (समूहगीत, गीतकार - ग.दि. माडगूळकर; संगीत दिग्दर्शक - सुधीर फडके; चित्रपट - जिवाचा सखा)

« PreviousChapter List