Bookstruck

भाग - 12

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

" सर ऐअरपोर्ट आ गया ... "

ड्रायवरचा आवाज ऐकताच श्री भानावर आला चिठ्ठी त्याने खिशात ठेवली ... कार मधून

उतरून टिकीट काउन्टर जवळ येताच त्याला आशुतोषची पाठमोरी आकृती दिसली ... तो त्याचा

दिशेने वळला तोच श्री जवळ जाईल ऐवढ्यात आशुतोष मागे फिरला ....

आज सहा वर्षानंतर श्री आशुतोष एकमेकांसमोर उभे होते .... काय बोलावं ?? सुचत नव्हतं

दोघांनाही समोरासमोर येताच दोघही न्याहाळत रहाले ..

आशुतोष पुढे येतच त्याने श्री ला आलिंग्नबद्ध केले .. श्री ही त्याच्या मिठीत विसावला .

" कसा आहेस मित्रा ? "

आशुतोषने दुर होतच श्री ला प्रश्न केला ....

" मी मज्जेत ... तू कसा आहेस हल्ली जेवन करतो की नाही किती बारीक झाला यार आशा तू ? "

काहीच न बोलता क्षणभर गप्प असलेला आशुतोष श्री ला म्हणाला ,

" चल फ्लाईट निघून जाईल ....'

श्री ला समजायला उशीर नाही लागला आशुतोष टाळत होता काही गोष्टी , नाईलाजाने श्री ला निघावं

लागलं त्याच्या सोबत ....

फ्लाईट वेळात आली .... श्री आशुतोष जवळच बसले .... दोघात भयाण शांतता विस्तारलेली होती .

श्रीला वाटलं फोन काढून ऋतुजाला मँसेज करून आय ल्व यू तरी म्हणावं आनंद तरी होईल तिला

पण , जाऊदे असं मँसेज वर बोलण्यापेक्षा कॉलवर सांगावं तिला नाहीतर भेटल्यावर भेट कधी होईल

आता माहिती नव्हते .... आशुतोष श्री ला न्याहाळत होता . कसला विचार करत असावा हा ??

म्हणून तो त्याला विचारता झाला ,

" काय रे श्री ऐवढा कसला विचार करतोय ? "

आशुतोषचा त्या बोलण्याने श्री भानावर येत म्हणाला ,

" हं काही नाही .... काही नाही रे आशु ... ! "

आशुतोष पासून पहिल्यादाचं श्री आपल्या मनातील भावना लपवून ठेवत होता त्याचा

मनात त्या क्षणाला विचार येऊन गेला ... जर आशुतोषला ऋतुजा बद्दल आणि माझ्या प्रेमा बद्दल

समजले तर आशु काय react करले ?? विरोध तर नाही दर्शविणार ना ! "

हा विचाराचा पसारा दुर सारत श्री आशुतोषला म्हणाला ,

" आशुतोष तिथे गेल्यावर काय होईल यार कोण असेल ती मुलगी तुझी आराध्या तर तू म्हणतो

ह्या जगात नाही मग तिच्यासारखीच हुबेहुब दिसणारी ती डॉक्टर कोण असेल ?? "

∞ ∞ ∞

« PreviousChapter ListNext »