भाग 1
सुलेखा नुकतीच ऑफिस मधून घरी आली होती. आज माधवी रजेवर असल्यामुळे जरा जास्त च काम पडलं होतं तिच्यावर. छान गरमागरम कॉफी घ्यावी आणि थोडं पडावं असा विचार करून सुलेखा उठली. Kitchen मध्ये जाऊन बघते त काय...दुधाचं पातेलं उघडच होतं गॅस वर आणि दूध पिऊन मांजर खिडकीच्या बाहेर मिशा चाटत बसली होती. आता मात्र फार झालं. किती राग आवरावा आणि किती चुका पोटात घ्याव्या...
15 वर्ष झाली लग्नाला आणि अजून हि निशा च्या स्वभावात काही बदल होत नव्हता. मनोहर, च्या अकस्मात जाण्यामुळे आधीच सुलेखा खूप एकाकी झाली होती. तशात च घरखर्च आणि अर्जुन च्या शिक्षण खर्च ह्यासाठी सुलेखा ने मनोहर च्या जागी ऑफिस मध्ये जॉब स्वीकारला होता.
अर्जुन चे इंजिनीरिंग पूर्ण झाले आणि त्याला मोठ्या कंपनी त जॉब पण मिळाला. आता तो सतत सुलेखा ला म्हणत असे कि आई तू जॉब सोड आणि आराम कर. बरोबरच होते त्याचे, खूप खंगून गेली होती ती. त्यावर ती म्हणत असे तू लग्न करून सून आणून दे मग करिन मी आराम.
एके रविवारी अर्जुन ने तिची हि इच्छा पण पूर्ण केली. दुपारी जेवणासाठी पाहुणे येणार अस म्हणाला अर्जुन आणि 11 च्या ठोक्याला बेल वाजली. सुलेखा दार उघडून पाहते तर काय एक अतिशय सुंदर मुलगी हातात पुष्पगुच्छ घेऊन उभी. अर्जुन ने तिला हात धरून घरात घेतली आणि विचारले की आई बघ तुझ्यासाठी चालेल का ही सून म्हणून???
सुलेखा च्या आनंदाला पारावर नव्हता.