लाट

लाट ~  ~

ती दुकानात काही तरी  खरेदी करत होती . ती  खरेदी केलेल्या वस्तूचे पैसे देत होती.  तेवढ्यात तिच्या मागे हलकासा स्पर्श पर्सला जाणवला . तिने झटकन मागे वळून पाहीले . चेहऱ्यावरून तरी पर्स मारणारा वाटला नाही . गोरटेला, उंच , आकर्षक चेहरा . तिने पुन्हा दुकान मालकाला पैसे मोजून दिले . दुकानाच्या पायऱ्या  उतरून ती रस्त्याला लागली . मध्येच एकदा मान वळवून तिने तो दिसतो का ते पाहीले . तो दुकानाच्या पायरीवर उभा होता . पण त्याचे लक्ष त्याच्या  सामानाच्या पिशवीकडे होते . त्याने आपल्याकडे पाहावे असे तिला खूप वाटत होते . पण तिचा निरुपाय झाला . ती घराकडे निघाली . रात्री जेवण झाल्यावर मध्येच कुंडीतल्या मोगऱ्याचा  सुवास आला . तिला अचानक पुन्हा त्याचा चेहरा आठवला . बाकीचा पसारा आटोपून ती गादीवर आडवी झाली . बराच वेळ तिला झोप येईना . उगीचच विचारावर विचार मनात येत राहिले . त्या लाटा सावरताना वैभवकडे तिचे अजिबात लक्ष नव्हते .  रात्री कधीतरी डोळा लागला तिचा …

सकाळी कामे उरकत उरकत एकीकडे ती मुलाला शाळेत जाण्याकरिता तयार करत होती . दुपारी एक डुलकी काढताना पुन्हा त्याचा चेहरा समोर आला . पण शेवटी अट्टाहासाने तिने झोप काढली . संध्याकाळी ती भाजी आणण्याकरिता तयार झाली . सुंदर हलक्या  लिंबू रंगाचा ड्रेस तिने घातला . चेहऱ्यावर पावडरचा हलकासा हात फिरवला . परदेशी अत्तर अंगावर फवारून ती निघाली . वाटेत मानसी दिसली . अग मुग्धा , आज काय पार्टीला चाललीस की  काय ? आणि ते पण हातात भाजीची पिशवी घेऊन ?

नाही ग….  नंतर एका वाढ दिवसाला जायचे आहे . मग पुन्हा कपडे बदलून तयार व्हायला वेळ नाहीय न ….  मुग्धा  हसली . आपल्याला या वयातही मस्त थापा मारता येत आहेत या  विचाराचे तिला हसू आले.  ती कालच्याच दिशेने निघाली . उगाचच तिने इकडे तिकडे करत तासभर वेळ घालवला . कालचा  तो तरुण दिसतो का ते तिला पाहायचे होते. पण तिची निराशा झाली . अंधार पडू लागला . नाईलाजाने ती परत फिरली .  घरी  तिची जराशी चिडचिड झाली . भर भर स्वयंपाक उरकत तिने मुलांना अभ्यासाच्या सूचना दिल्या . रात्री उशिरा आलेल्या वैभवला  तिने उशीर का झाला असेही विचारले नाही . त्याने रात्री तिला जवळ ओढले तेव्हाही तिने मान   फिरवली आणि झोपून गेली .

असेच ४ दिवस गेले . ती घरातून बाहेर  पडलीच नव्हती . पण भाजी पार संपली होती . तिला जावेच लागणार होते . कपडे न बदलता , फक्त केसावर कंगवा फिरवून ती निघाली . भाजी घेत घेत अचानक तिचे लक्ष  शेजारी उभ्या  असलेल्या छोट्या बाळाकडे गेले . अंदाजे दीड दोन वर्षाचे ते छोटे मुल आईशेजारी उभे होते . टोपलीतील लालबुंद टोमाटो पाहून ते आनंदित झाले होते . त्याने भाजीने गच्च भरलेल्या त्या टोपलीला ओढायचा प्रयत्न केला आणि अचानक ती पूर्ण टोपली त्याच्या अंगावर पडू  लागली . क्षणात मुग्धाने एका हाताने टोपलीला खालून हात लावला . आणि बाळाच्या अंगावर पडणारी टोपली स्वतःच्या डाव्या हातावर कशीबशी रेलून धरली . नेमका धक्का लागून वरचे कांदे बटाट्याचे पोते सुधा तिच्या हातावर आले . ती कळवळली . बाळाच्या आईने बाळाला टोपली खालून  उचलले .  मुग्धा ओरडू लागली . एका हाताच्या पंज्यावर बरेच वजन पडल्याने तिचा हात खूप दुखावला गेला होता . वर कांदे बटाट्याची पोटी आणि खालची टोपली पायावर अशा वेदनांनी ती रडू लागली . तितक्यात दुकानदाराने शेजारी येउन पोती  धरायचा प्रयत्न केला . पण मुग्धा  वेदनांनी खाली कोसळू लागली . तेवढ्यात बाळाच्या आईने बाळाच्या बाबांना  बोलावले . वेदनांनी चक्कर येउन कोसळणाऱ्या मुग्धाला बाळाच्या बाबांनी हातावर झेलले . डोळे मिटताना तिला त्या तरुणाचाच चेहरा दिसला .

डोळे उघडले तेव्हा ती दवाखान्यात होती . शेजारी बाळाची आई , बाळ  आणि तोच तरुण …. तिला काही समजेना . मग काही वेळातच तिला समजून चुकले . तो तरुण म्हणजेच या छोट्या बाळाचे बाबा …. तो काळजीने मुग्धाकडे पाहत होता . बाळाची आई मुग्धाला पेपरने वारे घालत होती . डॉक्टरांनी मुग्धाला एक इंजेक्शन दिले . हाताला जखम झाली होती . त्यावर बँडेज बांधले . पायावर लावायला एक मलम  आणि काही गोळ्या लिहून दिल्या . पाच मिनिटातच तो तरुण जाऊन ती सर्व औषधे घेऊन आला . मग त्याने मुग्धाला घराचा पत्ता विचारला . मुग्धाने तो सांगताच त्याने तिला आधार देत स्वतःच्या गाडीपर्यंत नेले . बाळाला घेऊन त्याची पत्नी आणि मुग्धाला मागे बसवून तो गाडी चालवू लागला . घरी पोचवले . तेवढ्यात वैभव पण आला होता . त्याला झाला प्रकार सांगून तो तरुण ,आणि सर्व जण   तिकडून निघून गेले . वैभवने वरण भाताचा कुकर लावला . मुग्धाला भरवले . मुलांना पण वाढले .

मुग्धाला हळूच पलंगावर झोपवले . हळू हळू तिच्या कपाळावर तो थोपटू लागला . मुले पण आज दंगा धुडगूस   न घालता झोपली . मुग्धाला ४ दिवसापासून घडलेले प्रसंग पुन्हा आठवू लागले . आपण काय वेडेपणा करत होतो त्याची जाणीव झाली . हळूच तिला झोपवून दुसऱ्या  खोलीत जाणाऱ्या  वैभवला तिने हात धरून थांबवले . आणि त्याच्या कुशीत शिरून स्वतःचे मन त्याच्या पुन्हा हवाली करून दिले.  आलेली लाट ओसरली होती . आता पुन्हा कधी येणाऱ्या लाटांची भीती तिला उरली नव्हती .

सोनाली लिखितकर