Bookstruck

Share on WhatsApp Share on Telegram
Chapter List

*शिवजयंती संपवण्याचे  टिळकाचे कारस्थान म्हणजे गणेशत्सोव।*
       मित्रांनो अस म्हणतात की फळ्यावर काढलेली एक उभी रेष तिला हात न लावता लहान करायची असेल तर तिच्या शेजारी दुसरी उभी लांब रेष काढा म्हणजे पहिली रेष आपोआप लहान दिसेल .तसाच प्रकार जाणीवपूर्वक शिवजयंती आणि गणेशत्सोवाच्या बाबतीत महाराष्ट्रात झाला आहे.वाचा
        शिवराय गेले! शंभूराजेही गेले व शिवरायांच्या 'शिवराज्याचे' पेशवाई मध्ये रूपांतर झाले.
        पेशवाई मध्ये शिवरायांचे व तुकोबारायचे नाव घ्यायलाच बंदी होती तर मग शिवरायांची समाधीच नेमकी कुठे आहे कुणालाच माहीत नव्हते. अशातच राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुलेंना छत्रपती शिवरायांची समाधी रायगड किल्ल्यावर असल्याची लेखी माहिती मिळाली व राष्ट्रपिता महात्मा फुले रायगडावर गेले.
        तीन दिवस सतत फिरल्यानंतर त्याना दगडांचा विविध आकारात रचलेला थर दिसला. जवळ जाताच हीच आपल्या राजाची समाधी आहे हे ओळखले व त्या समाधी ची अवस्था पाहून त्यांना गहिवरुन आले. काट्यांनी-धूळ-मातीने भरलेल्या समाधीला महात्मा फुलेंनी स्वच्छ केले व धोत्राच्या सोग्यामधे आणलेली फुले त्या शिवरायांच्या समाधी वर वाहून त्यांना मानवंदना दिली.
          ही गोष्ट गडाच्या खाली असलेल्या गावच्या ग्राम-जोश्याला कळली व तो आपले जानवे हलवित समधीजवळ आला व समाधीवर टाकलेल्या फुलांना लाथेने उधळून लावले व बोलला "एका कुणबट राजाची पुजा करतो! मला शिधा-दक्षिणा द्यायचे राहिले बाजुला!" महात्मा फुलेंनी त्या ब्राह्मणाचा गळा पकडला व त्याला "गडावरुन खाली फेकून देईल" असे धमकावले व हे ऐकताच त्या ब्राह्मणाने पळ काढला.
          नंतर राष्ट्रपिता महात्मा फूले पुण्यात आले व पुण्यातील गंजपेठेत लक्ष्मीनारायन थियेटर च्या चौकात जगातील सर्वांत पहिला शिवजन्मोत्सव दहा  दिवस साजरा केला.
            तारीख होती १९ फेब्रुवारी १८६९. या कार्यक्रमाची आजही लेखी नोंद आहे.तेव्हा भटमान्य टिळकांचे वय फक्त १३ वर्षे होते...
     आणि तेव्हापासूनच शिवरायांची जयंती १० दिवस साजरी करण्याची परंपरा महात्मा फुलेंनीच सुरू केली.
         कुळवाडीभूषण बहुजन-प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी राष्ट्रपिता महात्मा ज्योतीराव फुले यांनीच शोधुन काढली...
           जगातील पहिली शिवजयंती महात्मा फुलेंनी साजरी केली...
            पहिले मराठी शिवचरित्र राष्ट्रपिता जोतिराव फुलेंनी लिहिले...किंमत - 6 आणे...
           शिवरायांवर पहिला पोवाडा महात्मा फुलेंनी लिहिला...
           शिवरायांचा खरा इतिहास महात्मा फुलेंनी लोकांसमोर आणला व ब्राह्मणांनी खरा इतिहास दडपवून ठेवून खोटा इतिहास आमच्यासमोर मांडला...
           राष्ट्रपिता महात्मा फुले जिवंत असेपर्यंत ते दरवर्षी १० दिवसांची शिवजयंती साजरी करायचे, मात्र १८९० ला महात्मा फुले वारले व १८९६ ला टिळकांनी 'तिथी' नुसार शिवजयंती साजरी केली व 'तारखे' नुसार फुलेंनी सुरू केलेल्या शिवजयंतीला बंद पाडण्याचे षडयंत्र चालविले.
म्हणजे मुळ शिवरायांच्या जयंती मध्ये 'तिथी' चा वाद जर कोणी घातला असेल तर तो म्हणजे भटमान्य टिळकांनीच...
        टिळकांनी १८९६ नंतर तिथी नुसार शिवजयंती साजरी करीत असताना शिवरायांच्या फोटोसोबत पेशवे नानासाहेब फडणवीस चा फोटो ठेवायचे.  हा तोच फडणवीस आहे ज्याने शिवरायांच्या शिवशाहीच्या विरोधात असलेल्या पेशवाईला टिकवून ठेवण्याचे काम केले...
           मात्र अशा ह्या शिवद्रोही टिळकांनाच पाठ्यपुस्तकात 'शिवजयंती चे जनक' दाखवून  राष्ट्रपिता ज्योतीराव फुलेंविषयी असलेला खरा इतिहास लपविलेल्या गेला आणि आजही टिळकच आम्हाला शिकविले जातात!!!
       त्याच वर्षी टिळकांनी गणेश उत्सवाला पण सुरुवात केली ते शिवजयंतीला मागे टाकण्यासाठीच!
         जो महाराष्ट्र गणपतीला ओळखत सुद्धा नव्हता, जो गणपती फक्त चित्पावन भटा-ब्राह्मणांच्या घरात होता, तो गणपती टिळकांनी रस्त्यावर आणला व दहा दिवसांचा गणेश उत्सव सुरू केला व दहा दिवस चालणाऱ्या शिवजयंतीला तारखेच्या व तिथीच्या वादात अडकवून बंद पडण्यास सुरुवात केली व बुद्धीला न पटणाऱ्या कथा लोकांच्या माथी मारले ...
पुरावा :-
एकाच वेळेला टिळकांनी गणेशोत्सव व तिथीनुसार शिवजयंतीला सुरुवात केली असल्यास आज संपुर्ण भारतात गणेशोत्सव साजरा केला जातो पण शिवरायांची शिवजयंती महाराष्ट्रात एक दिवस सुध्दा धड़ साजरी केल्या जात नाही...
           खरे तर राष्ट्रपिता महात्मा फुलेंनी सुरु केलेल्या शिवजयंतीला बंद पाडण्यासाठीच व लोकांना शिवरायांचा विसर पाडण्यासाठीच भटमान्य टिळकांनी गणेशोत्सव साजरा करायला सुरुवात केली...कारण उघडपणे लोकांना "शिवजयंती बंद करा" असे म्हणायची हिंमत ते करु शकत नव्हते, म्हणुनच गणेशोत्सव !
     'तारीख' संपुर्ण जगभर एकाच दिवशी असते म्हणजे १९ फेब्रुवारी ला शिवजयंती संपूर्ण जगभर साजरी केल्या गेली असती. म्हणुन संपूर्ण जगाला शिवरायांची ओळख न व्हावी म्हणुनच 'तिथी' चा खेळ टिळकांनी सुरु केला...
कारण तिथी फक्त भारतात व तेही महाराष्ट्रातच बघितल्या जाते आणि ती सुद्धा ब्राह्मणच बघतात ! म्हणजे शिवरायांना महाराष्ट्रापुरते मर्यादीत ठेवणे हाच भटमान्य टिळकांचा हेतु होता व त्यात ते यशस्वी झालेच !!!
म्हणुन मंडळी! गणेशोत्सवाचा खरा इतिहास जाणून घेणे गरजेचे आहे...
     आमचे प्रेरणास्थान असलेल्या शिवरायांना या विदेशी चित्पावन ब्राह्मणांच्या खोट्या इतिहासाच्या कारावासातून मुक्त करणे गरजेचे आहे व ज्या  बहुजन महापुरुषांनी विदेशी चित्पावन ब्राह्मणांच्या गुलामीच्या विरोधात स्वातंत्र्याचे आंदोलन चालविले तेच आंदोलन उभारून विदेशी चित्पावन ब्राह्मणांपासुन भारतीय बहूजन  रयतेला आज़ाद करायचे आहे...!!!    
*जय जिजाऊ-जय शिवराय*

Chapter List