ज्या घरात नकारात्मकता असते, त्या घरातील लोकांची मानसिकताही नकारात्मक बनते. असे व्यक्ती कोणत्याही कामाला सुरुवात करण्यापूर्वी नकारात्मक विचार करतात. त्यामुळे त्यांच्या पदरी नेहमी अपयश पडते, त्यांचा मानसिक तणाव वाढतो व त्यांना पुरेशी धनप्राप्तीही होत नाही. पुरातन पंरपरेंमध्ये असे काही उपाय सांगितले आहेत, ज्यामुळे नकारात्मक विचार दुर होतात व घरातील सुख-समृद्धी वाढते.
जाणुन घ्या, ते ४ उपाय ज्यामुळे नकारात्मक विचार दुर होतात....
*पहिला उपाय*
रोज सकाळी घराबाहेर रांगोळी अवश्य काढावी. रांगोळीमुळे घरातील सकारात्मकता वाढते, अशी मान्यता आहे. यामुळे देवी लक्ष्मी आणि इतर देवी-देवता आपल्या घराकडे आकर्षित होतात.
*दुसरा उपाय*
रोज सकाळी लवकर उठा व आंघोळ झाल्यानंतर तांब्याच्या कलश पाण्याने भरा. यानंतर त्यामध्ये तुळशीची पाने टाका. नंतर हे पवित्र पाणी घरातील मुख्यदार आणि सर्व खोल्यांमध्ये शिंपडावे. यामुळेही घरातील नकारात्मकता दुर होते.
*तिसरा उपाय*
रोज सकाळी लवकर उठल्यावर तुळशीच्या रोपट्याला पाणी अर्पण करावे. हे करत असताना विष्णू मंत्रांचा जप करावा.
मंत्र-
*ऊँ नमो भगवते वासुदेवाय नम:*
*चौथा उपाय*
घरातील मंदिरात रोज सकाळी तूपाचा दिवा लावावा. कपूर जाळून देवाची आरती करावी. तूपाचा दिवा आणि कपूरच्या धुरामुळे घराची पवित्रता वाढते. वातावरण शुद्ध होते.
🕉 श्री स्वामी समर्थ 🕉