Bookstruck

शैक्षणिक संस्थांमध्ये

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

बॉलिवूडपाठोपाठ आता शैक्षणिक संस्थांमध्येदेखील metoo माध्यमातून तरुणी कैफियत मांडू लागल्या आहेत. पुण्यातील ‘सिम्बायोसिस सेंटर फॉर मीडिया अँड कम्युनिकेशन’मधूनही (एससीएमसी) लैंगिक शोषणाबाबतचे काही प्रकार समोर आले आहेत. सिम्बायोसिसमधील काही आजी-माजी विद्यार्थिनींनी एकत्र येऊन सोशल मीडियावर हे अनुभव शेअर केल्यानंतर शैक्षणिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

‘एससीएमसी’च्या 10 पेक्षा अधिक विद्यार्थिनींनी ट्विटरद्वारे त्यांच्या बाबतीत घडलेल्या लैंगिक शोषणाच्या प्रकारांविषयी व्यक्त होण्यास सुरुवात केली. त्यात त्यांनी काही विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या नावांचाही उल्लेख केला. तसेच विमाननगर कॅम्पसमध्ये अशा प्रकारचीच संस्कृती असल्याचेही लिहिले आहे. एका माजी विद्यार्थिनीने तिच्या इंटर्नशिपदरम्यान झालेल्या लैंगिक शोषणाविरोधात कॉलेजातील इंटर्नशिप समन्वयकाकडे तक्रार केली असता, तिची इंटर्नशिप थांबवण्यात आल्याचे नमूद केले आहे. तसेच, लैंगिक शोषणाबाबत प्रशासनाचे लक्ष वेधूनही काहीच कारवाई झाली नसल्याचा आरोपही विद्यार्थिनींनी आपल्या ट्विटरवरील पोस्टमधून केला . source

« PreviousChapter ListNext »