Bookstruck

आलोक नाथ

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter List

टीव्ही आणि बॉलिवूडच्या जगात ‘संस्कारी बाबुजी’ अशी प्रतिमा असलेले अभिनेते आलोक नाथ यांच्यावर ‘तारा’ या गाजलेल्या मालिकेच्या निर्मात्या आणि लेखिका विनता नंदा यांनी बलात्काराचा आरोप केला आहे. एकानंतर एक आता अनेक जणी आलोक नाथ यांचा दुसरा चेहरा जगासमोर आणत आहेत. अभिनेत्री नवनीत निशान, संध्या मृदुल यांनीही आलोकनाथ यांनी त्यांच्यासोबत गैरवर्तन केल्याचे सांगितले आहे. आता अभिनेत्री रेणुका शहाणे हिने आलोकनाथांची दोन रुपे खूप पुर्वीच माहिती झाल्याचे सांगितले आहे.

तारा या चित्रपटाच्या लेखिका विनता नंदा यांनी सांगितल्यानुसार, मद्यात काहीतरी मिसळून आलोक नाथ यांनी त्यांच्यावर बलात्कार केला होता. या वादानंतर याच मालिकेत काम करणाऱ्या नवनीत निशानने देखील आलोक नाथ यांच्या वागण्याला कंटाळून मी त्यांच्या कानफटात लगावली होती असे नुकत्याच एका मुलाखतीत सांगितले आहे. त्यानंतर हम साथ साथ है चित्रपटातील महिला सदस्यासमोरच आलोक नाथ यांनी कपडे काढले असल्याचे या महिला क्रू मेंबरने एका मुलाखतीत सांगितले आहे. यानंतर संध्या मृदुलने आलोक नाथ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. संध्याने एका मालिकेत आलोक नाथ यांच्यासोबत काम केले होते. या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान तिला खूप वाईट अनुभव आला होता. आलोक नाथ मला सर्वांसमोर मुलीसारखं वागवायचे, मात्र त्यांच्या संस्कारी चेहऱ्यामागे असभ्य पुरुषाचा चेहरा दडला आहे, चित्रीकरणाच्या काळात त्यांनी मला वारंवार फोन करून मानसिक त्रास दिला. माझ्या रुममध्ये येऊन असभ्य वर्तन केले असे अनेक गंभीर आरोप संध्याने केले आहेत.

रेणुका शहाणेने आलोक नाथ यांच्यासोबत हम आपके है कौन या चित्रपटात काम केले होते. तसेच इम्तिहान या मालिकेत देखील रेणुका आलोक नाथ यांच्या मुलीच्या भूमिकेत झळकली होती. आलोक नाथ यांच्यावर करण्यात आलेल्या या आरोपानंतर रेणुकाने एका वेबसाइट्शी बोलताना सांगितले की, माझे भाग्य चांगले होते की माझे कधीच त्यांच्यासोबत आउटडोअर शूट नव्हते. माझा त्यांच्या सोबत काम करण्याचा अनुभव खूप चांगला होता. पण त्यांची दोन रूपं आहेत असे मी आधीच ऐकले होते. दारू प्यायल्यानंतर त्यांना भान नसते असे मी ऐकून होते. दीपिका देशपांडे या अभिनेत्रीने मला त्यांच्या या दोन रूपांविषयी नव्वदच्या दशकातच सांगितले होते. तसेच ते तरुण मुलींशी पार्टीत दारू पिऊन वाईट वागतात असे मला काहींनी सांगितले होते. पण आता आलोक नाथ यांच्यावर सगळ्यांनी केलेल्या आरोपानंतर मला चांगलाच धक्का बसला आहे, असे रेणुका शहाणे म्हणाली आहे.

Source
« PreviousChapter List