गंमत जंमत
प्रसंग होता तो एके काळचा नुकत्याच उनाड तरुना इतुन मी इमानदारीने पैसे कमवण्यासाठी नारायणगाव येथून एका ग्यारेजकामावरून रोज जुन्नरकडे येत होतो प्रवासाचे माध्यम म्हणजे काय तर प्रवासी जीप .जेमतेम रोज पाऊण तासाचा प्रवास एके संध्याकाळी पावसाळी दिवसात मी जुन्नरकडे रवाना होताना जीपमध्ये पुढील सीटवर 3 लोक बसलेले असताना दरवाज्याकडील व्यक्तीला आत सरकण्याची विंनंती केली .परंतु त्याने दिसत नाही का तुला 3 जण बसलेत असे सांगून मागील बाजूस मला हुसकले .नीट सांगा ना म मला वाटलं ड्रायव्हर साईटवरील व्यक्ती ड्रायव्हर आहे असं मी ही उलट बोलून मागे बसून घेतलं. तरुणाईचं ना ती कुणाचं काही ऐकण्याच ते वयच न्हवतं ना. तेवढ्याच दुसऱ्या नंबरच्या जीप वाल्यांन ती जीप भरावी म्हणून जुन्नर जुन्नर म्हणून आवाज देऊन जीपमध्ये प्यासेंजर कोंबण्यास सुरवात केली रोजच्याच प्रवासामुळे इतर ड्रायव्हर ही ओळखीचेच. म काय मी आतून आवाज दिला गमतीने किती सिटीची परवानगी आहे रे तुला ?तेवड्यात पुढे माझ्यावर मघाशीच खेकसलेल्या व्यक्तीने त्याच्या रांगडी आवाजत कोण रे तू ?कोणाला परवानगी पहायची? असे मला उद्देशून बोलला. मी ड्रायव्हरने केलेल्या स्मित हस्यांकडे पाहुन दुर्लक्ष्य केले. गाडी सुरू होऊन प्रवासास सुरवात झाली आता खरी गंमत तर पुढे आली पुढील बाजुला बसलेला गृहस्थ आता मला उद्देशून शिवी गाळ करू लागला एकंदरीत त्याच्या हाव भावावरून मी कळून चुकलो की तो पोलीस नुसता पोलीस नसून प्यालेला आहे, म काय जुन्नर येई पर्यंत तो मला बघतोच तुला आणि मी पण बघतोच तुला गाडी थांबुदेत असे करता करता एक एक प्रवासी एक एक स्टॉप ला उतरत गेला .शेवच्या स्टॉप ला गाडी थांबली मी मागून उतरलो पैसे देण्यासाठी आणि तो पोलीस मलाच म्हणाला साला मागच्या स्टॉप ला उतरून पळाला वाटत मीही चुपचाप निघून आलो