Bookstruck

दीपावलीची विविध नावे

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

दीपावलीचे मूळचे नाव यक्षरात्री असे होते हे हेमचंद्राने नोंदवले आहे, तसेच वात्स्यायनाच्या कामसूत्रातही हेच नाव नोंदलेले आहे. नीलमत पुराणया ग्रंथात या सणास "दीपमाला" असे म्हटले आहे. कनोजाचा राजा हर्षवर्धन याने नागानंद नाटकात या सणाला "दीपप्रतिपदुत्सव" असे नाव दिले आहे. ज्योतिषरत्नमाला या ग्रंथात "दिवाळी" हा शब्द वापरला आहे. भविष्योत्तर पुराणात दिवाळीला "दिपालीका" म्हटले आहे, तसेच काल्विवेक या ग्रंथात तिचा उल्लेख "सुखरात्रि" असा येतो.व्रतप्रकाश नावाच्या ग्रंथात "सुख सुप्तिका" म्हणून दिवाळी ओळखली जाते.

« PreviousChapter ListNext »