Bookstruck

दिवाळी अंक

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter List

दिवाळीनिमित्त प्रतिवर्षी मराठी तसेच अन्य भाषिक साहित्य क्षेत्रात दिवाळी अंक प्रकाशित केले जातात. यातील विशेष औचित्यपूर्ण अंकांना पारितोषिकही दिले जाते.

दिवाळी अंक हे मराठी वाङ्‌मयीन संस्कृतीचे वैशिष्ट्यपूर्ण अंग आहे. दिवाळी सणाच्या सुमारास निघणार्‍या विशेष अथवा वार्षिक नियतकालिकांना दिवाळी अंक असे म्हणतात.

मनोरंजन हा सन १९०९ साली छापला गेलेला मराठीतला प्रथम दिवाळी अंक होता. सन २००९ मध्ये दिवाळी अंकांचे शतक पूर्ण झाले आहे. दिवाळीचा फराळ, फटाके, मिठाया या समवेतच दिवाळी अंक ही सुशिक्षित व साहित्यप्रेमी घरांसाठी एक आवश्यक घटक आहे. पूर्वीच्या दिवाळी अंकांत मनोरंजनासमवेतच परंपरा, संस्कृती याची माहिती असे. काळानुरूप त्यात बदल झाला आहे.

महाराष्ट्रात सुमारे ८०० च्या जवळपास दिवाळी अंक प्रदर्शित होतात.

अनेक मराठी वृत्तपत्रेही वाचकांसाठी दिवाळी अंक काढत आहेत.त्यासोबतच आरोग्य, खेळ यांसारख्या अनेक विषयांना वाहिलेले दिवाळी अंकदेखील छापण्यात येतात. या सोबतच ऑडियो व्हिज्युअल दिवाळी अंकही निघत आहेत.

आरंभ मासिकाचा पहिला दिवाळी अंक २०१८ मध्ये प्रकाशित झाला. हा दिवाळी अंक पूर्णपणे ऑनलाईन आणि डिजिटल असून मासिक फक्त अँड्रॉइड ऍप्प द्वारे प्रकाशित होते.
संपादक आहेत अभिषेक ठमके.

https://play.google.com/store/apps/details?id=com.marathi.magazine.aarambh

« PreviousChapter List