सांजवेळ आयुष्याची

एकदा रेल्वेतून प्रवास करत असतांना  .

माझे सहज लक्ष चार वर्षाच्या लहान मुलाकडे गेले  मुलगा खुप गोंडस होता . त्याचे आई वडील बाजूच्या सिटवर बसलेले होते आणि तो आपल्या आजोबांसोबत खिडकी जवळ बसून गप्पा मारत होता  . त्या लहान मुलाची गंमत पाहत होती तो त्याच्या आजोबां सोबत गप्पा मरत होता आणि थोड्यावेळात तो मुलगा आजोबांच्या कुशीत झोपला . त्याची आई मला म्हणाली खूप लाडका आहे आजोबांचा दोघांचे खूप छान जमतं एकमेकांशिवाय करमत नाही दोघांना . तितक्यात आजोबा हसून म्हणाले " सुनबाई  , मुद्दला पेक्षा व्याज जास्त हवहवंस वाटतं ,

मुद्दल तर आपलीच असते पण व्याज ही आपली कमाई असते ".  खरंच , आजकाल वृध्दाश्रमातील कटू बातम्या ऐकून मन खिन्न होते . पण  हा प्रसंग पाहिला आणि मनात म्हणाले खरंच  सुखी कुटूंबाची वेगळी व्याख्या आणखी कोणती असावी !

त्या आजोबांचा व्याज आणि मुद्दलाचा हिशेब माझ्या मनावर प्रभाव टाकून गेला .

खरंच प्रत्येक नातं हे गूलाबाच्या कळी सारखं असतं हळूहळू खूलणारं जसजसं त्याला हळूवार प्रेमाची फुंकर मिळते तसतसं ते हळूवार खूलत जातं आणि जितकं खूलत जातं तितकं आधिकाधिक सुंदर आणि सुगंधित होतं .

आयुष्याची संध्याकाळ झाली की जेष्ठ मंडळींना निवांत वेळ खुप मिळतो . नोकरी व्यसायातून निवृत्त झालेले असतात .निम्म आयुष्य दगदग आणि टेंशन मध्ये संपलेले असते . निवृत्ती नंतरचा काळ हा निवांत असतो . पण ही निवांत वेळ काहींना त्रासदायक तर काहींना कंटाळवाणी वाटू लागते . काही मोजकेच जेष्ठमंडळी निवृत्ती नंतरची वेळ आनंदात जात असते .  आयुष्याची सांजवेळ कंटाळवाणी आणि त्रासदायक का वाटावी ? याला जबाबदार कोण? जेष्ठ मंडळी कि तरुण वर्ग ? कि आजकाल ची दिवसेंदिवस बदलत चाललेली जिवन शैली ?

कारणे अनेक असू शकतात . जर वृध्दाश्रमातील जेष्ठ मंडळींना प्रश्न विचारला तुमचा मुलगा काय करतो  . तर  डॉक्टर ,इंजिनिअर , प्रोफेसर आहे  मोठ्या पदावर साहेब आहे विदेशात आहे अशी त्यांच्या कडून उत्तरे मिळतात . कोणत्याही शेतकऱ्याने किंवा हातमजूरी करणार्या व्यक्तिने आपल्या आई वडिलांना वृध्दाश्रमात आणून सोडले नाही .  याला कारण त्यांची आपल्या आई वडिलांना सांभाळून घ्यायची तयारी असते . पण तरीही काही घरात जेष्ठ मंडळींवरुन लहान मोठे वाद होत असतात . याला कारण त्यांची जुनी विचारसरणी आजच्या तरुण वर्गाशी जूळत नाही .

तसचं मोठ्या शहरांमध्ये ही होते जेष्ठमंडळींचे आणि तरुण वर्गाचे विचार जूळत नाही . .

आजकाल सर्वत्र नकारात्मक विचारांचा प्रभाव आपल्याला जास्त पहायला मिळतो . त्यामुळे आजच्या युवा वर्गात सहन शक्ती फार कमी झाली आहे . तसेच वय वाढले की जेष्ठमंडळींचा स्वभावात लहान मुलांसारखा चिडचिडेपणा आलेला असतो . त्यांच्या आपल्या मुलांकडून आणि सूने कडून खूप अपेक्षा असतात .

प्रत्येक युवा वर्ग त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो . पण आपण पाहतो प्रत्येक घरात आपल्या मुलाची आणि सुनेची तुलना इतरांशी केली जाते . शेजारच्या मुलाने आईवडीलांना इकडे तिर्थयात्रेला पाठवले ,फिरायला पाठवले हे आणले  ते आणले .  मुलाने काही आणले की एकतर शेजारच्या मुलांशी किंवा शेजारच्या सुने शी तुलना करणे तो किती चांगला तु किती कमी पडतो असे वारंवार टोमणे मारणे .  सारखे सारखे प्रत्येक कामात टोचून बोलणे .सुनेची तुलना आपल्या लेकी शी करणे तिला सारखे टोचून बोलणं. सारखे सारखे आमच्या काळी असे नव्हते . आम्हाला हे मिळाले नाही ते मिळाले नाही . आम्ही असे कष्ट केले म्हणून तुम्हाला हे सुख पहायला मिळाले  . सारखे सारखे असे टोचून बोलणे ,  त्यामूळे नात्यातली गाठ कळत नकळत कुठं तरी सैल होत जाते आणि मनोमन दुरावा निर्माण होत जातो .  मुली आपल्या आईचे घर सोडून येतात त्या आपल्या सासू सारर्यां मध्ये आई वडील शोधित असतात पण वारंवार त्यांची इतरांशी केलेली तुलना त्यांच्यातील दुरावा निर्माण करायला कारणीभूत ठरत असते . जसं नाण्याला दोन बाजू असतात तसेच काही मूलींमध्ये सासरी जूळवून घ्यायची तयारी नसते त्यांच्यात सहन शक्ती कमी असते . त्यामुळे घरात वाद होत असतात .

नातं हे फूलपाखरांसारखे  असते . त्याला जर मोकळं सोडलं तर मोकळेपणाने उडतांना ते खूप सुंदर दिसते . आणि हातात घट्ट धरून ठेवले तर त्याचे पंख चुरगळुन जातात व त्याचे सौंदर्य नष्ट होते . त्याप्रमाणे आपलं आणि आपल्या लेकरां मधील नाण्याला जर आपण घटृ धरून ठेवले . नेहमीच त्यांच्या प्रत्येक कामात जर चुका

काढत गेलो तर त्यांच्यात आणि आपल्यातील पोकळी ही वाढतच जाते . आपण आपलं आणि मुलांमधील नातं जास्तच घट्ट धरून ठेवण्यासाठी सगळेच मार्ग अवलंबत असतो . त्यातील काही मार्ग त्यांना आणि आपल्याला ही त्रासदायक असतात .

मुलं तारुण्यात येतात तेव्हा त्यांच्या मध्ये एक नवं चैतन्य निर्माण झालेले असते . त्यांच्यातील ते चैतन्य वेळीच ओळखून त्यांना मित्र बनून मार्गदर्शन केले पाहिजे . घरात सुन असेल तर तिच्यातील गुण ओळखून तीला ही प्रोत्साहन दिले पाहिजे . जेव्हा तुम्ही मुलं आणि सुनेचे खरे मित्र बनून त्यांना प्रोत्साहित कराल तेव्हा त्यांच्या मनात तुमच्या पासून दूर जायचा विचार कधीही येणार नाही . उलट वेळोवेळी ते तूमचेच मार्गदर्शन घेण्यासाठी उत्सुक असतील .

उतारवयात जेष्ठ होवून मार्गदर्शक बनावे म्हातारे होवून टोमणे मारणारे नाही .