Bookstruck

सर्व वाचकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!!

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

संपादकीयच्या माध्यमातून दर वेळेस मी आपल्याशी संवाद साधत असतो. प्रस्तुत अंकामध्ये आपण अक्षर प्रभू देसाई आणि आशिष कर्ले यांच्या लेखणीमधून संपादकीय वाचणार आहोत. हा अंक मी या दोघांसह आमचे प्रुफरीडर्स  सविता कारंजकर आणि विश्वास पाटील, कंटेंट ऑर्गनायझिंग मीना झाल्टे, सल्लागार निमिष सोनार आणि सिद्धेश प्रभुगावकर सोबतच मार्गदर्शक तसेच कॉपीरायटर गौरी ठमके यांना समर्पित करतो. ह्या टीममधील गौरी वगळल्यास इतर सर्वांचा प्रकाशक म्हणून हा पहिलाच दिवाळी अंक आहे.

आशा करतो आपणा सर्वांना आरंभ मासिकाचा पहिला दिवाळी अंक पसंतीस उतरो. आता प्रतीक्षा कसली करताय? साहित्याचा अनमोल नजराणा आपली वाट पाहत आहे.

लोभ असावा.

अभिषेक ज्ञा. ठमके
संपादक

« PreviousChapter ListNext »