Bookstruck

माजघर (आगरी कविता)

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

अजित विष्णू उमराटकर
मु.पो- काल्हेर, ता- भिवंडी, ठाणे
मो.नं- ८८८८६२५०६६

पयले कौलांचा घर होता पुन रास भारी होता!
कारन परतेक घराला एक माजघर होता!

कनचा सन अला की समदी माजघरान जमाची,
आवरीशा मिलून काम समदा कराची,
समदयांचे हावशेला उदान जाम होता.
कारन परतेक घराला एक माजघर होता..

आख्खे कुटमांची लोखा यकेजवल होती,
कनचे बी परसंगाला धावाला होती,
समद्यानां समदयांचा आधारबी होता.
कारन परतेक घराला एक माजघर होता..

चार चुली आसल्या तरी गोरीनं रेत,
भाना झेवून जेवाला माजघरान येत,
पोरा डारांना शेलाचा बाजार तो होता.
कारन परतेक घराला एक माजघर होता..

« PreviousChapter ListNext »