Bookstruck

'सण दिवाळी'

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

निलेश मधुकर लासुरकार
 
येते वर्षातून एकदा
नवचैतन्याची आस
भेद, तिमिर करी दूर
सण हा दिवाळी खास

हाती सोनियाचं पात्र
वाट पाहते उभी दारात
चाहूल लक्ष्मी आगमनाची  
पूजा मांडली घरात

लाह्या बत्ताशे ताटात घेतले  
काढली गळ्यातली एकदाणी
आज दागिन्यांनी पुजते तुला
जरी असे तू स्वतः स्वर्णराणी

चकल्या, करंज्या केल्या
भुकेली वासाची तू जरी
तुझे आगमन उत्सव आमचा
तिचं ओढ आम्हास खरी

बघ कसा हा झगमगाट
प्रकाश घेऊन तू आली
अंधकार दूर जाहला  
तेजोमय तू रात्रही केली

द्वेष उडवला जणू रॉकेट
फुलझडी भासे तारामंडल दृष्टी
फक्त तुझ्या आगमनानेच
बघ कशी चमकली सृष्टी

पौर्णिमा लाजली आज
लख्खता कशी या दिवशी?
मला तर वाटते दिवाळी
यावी हर एक अमावशी!
यावी हर एक अमावशी!

« PreviousChapter ListNext »