Bookstruck

असेही काही क्षण येतील तेव्हा...

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

विकास दिनकर पाटील (ओझर्डे सांगली)
M.A M.Ed D.S.M / मोबाईल नंबर 8208968105

आपणच असं का गृहित
धराव
सगळच कसं आपल्या मनासारखं असावं
सगळेच नसतात आपल्या विचाराचे
की सर्वांना घेऊन पुढे चालायचे
जेव्हा असेही काही क्षण येतील
तेव्हा नाराज व्हायचं नसतं
दुसऱ्याचे ऐकावे त्याला समजून घ्यावे
अशी सद्बुद्धी सर्वांचीच असेल असेही नाही
'मी' पणाच्या अहंकारापोटी
दुसऱ्याचा बळी घेणारे भेटतील पदोपदी
जेव्हा असेही काही क्षण येतील तेव्हा नाराज व्हायचं नसतं
आपल्या प्रमाणे इतरांनाही मन असत
असे मानणारे भेटतीलच असेही नाही
दुसऱ्याच्या भावनेवरती सूडाचा वर्षाव करणारी
असुरी बुद्धी अनुभवास येईल कधीतरी
जेव्हा असेही काही क्षण येतील
तेव्हा नाराज व्हायचं नसतं
मी कोण? माझी भूमिका काय? माझी जबाबदारी कोणती?
याची आठवण सर्वांनाच राहील असेही नाही
मी फक्त शहाणा, बाकीचे सगळे वेडे
असे म्हणणारे येतील समोर कधीतरी
जेव्हा असेही काही क्षण येतील
तेव्हा नाराज व्हायचं नसतं

« PreviousChapter ListNext »