Bookstruck

संतांचा हा दास नरहरी सेवेस

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

चरणीं ठेविले पद्मतीर्थ झालें । गरुडपारीं केलें रामतीर्थ ॥ १ ॥

भागीरथीतीरीं राम धनुर्धारी । अहिल्या उद्धरी क्षणमात्रें ॥ २ ॥

पताकांचा भार नामाचा गजर । प्रेमाचा पाझर साधुसंतां ॥ ३ ॥

संतांचा हा दास नरहरी सेवेस । राहो रात्रंदिवस नाम घेत ॥ ४ ॥

« PreviousChapter ListNext »