Bookstruck

येईं बा सद्‌गुरुराया । नि...

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

येईं बा सद्‌गुरुराया । निरसीं भवबंधन माया ॥ध्रु०॥

पहासी असा किती अंत अनंता । काय मागसी मज भगवंता ॥

पापी असें तरीं तूं अघत्राता । धांवत ये सदया ॥येईं बा०॥१॥

तुज विण कोणा बाहूं समर्था । तारक त्रिभुवनीं आन न नाथा ॥

गाऊनी गाथा नमवूं माथा । अभय करीं सखया ॥येईं बा०॥२॥

गुंतलासी कोठें गुरुनाथा । उपेक्षिसी कां दीन अनाथा ॥

मरतो तव विरहें अजी ताता । तारीं ’रङग’ कृपया ॥येईं बा०॥३॥

« PreviousChapter ListNext »