मन मर्कट चंचल । धांवे सैर...

मन मर्कट चंचल । धांवे सैरावैरा खळ ॥१॥

मोहमदिरा पीऊन । नाचे विषयवृक्षीं जाण ॥२॥

शस्त्र निःसंगे ताडिजे । दोर अभ्यासें बांधिजे ॥३॥

ध्यानधारणे लाविजे । आत्म ’रङग’ तैं पाविजे ॥४॥