मागणें तें एक आहे । कृपाद...

मागणें तें एक आहे । कृपादृष्टीं बाळ पाहे ॥१॥

नको वैभवसंपत्ति । सदा राहूं दे सन्मति ॥२॥

मुखीं नसावें अनृत । सदा सेवावे सत्संत ॥३॥

’रंगा’ आन चाड नाहीं । सर्व तुझें रुप पाही ॥४॥