करुणासागर देव विश्वंभर । ...

करुणासागर देव विश्वंभर । दत्त दिगंबर ध्याईं मना ॥१॥

तीन शिरें हात सहा संत गात । वेदश्वान भाट मूक झाले ॥२॥

वर्णीतां वैखरी न चले हो हरी । केव्हां नृकेसरी पाहीन बा ॥३॥

संतांचे माहेरा कां करी अव्हेरा । ’रंग’ येर झारा कोण टाळी ? ॥४॥