चला चला हो माहुरीं । भक्त...

चला चला हो माहुरीं । भक्तजनांचे माहेरीं ॥१॥

मात रेणुकेचें स्थान । तेथें वसे दत्त जाण ॥२॥

करी भक्‍तांचा सांभाळ । द्वैत येऊं नेदी काळ ॥३॥

’रंग’ म्हणे काळ गेला । हाता फिरोनी न आला ॥४॥