मनें मन चोरी मनोमय धरी । ...

मनें मन चोरी मनोमय धरी । कुंडली आधारी सहस्त्रकारी ॥ १ ॥

मन हें वोगरु आदि हरिहरु । करी पाहुणेरु आदिरूपा ॥ २ ॥

सविया विसरू घेसील पडिभरू । गुरुकृपा विरु विरे सदां ॥ ३ ॥

मुक्ता मुक्तचित्तें गुरुमार्ग विते । पावन त्वरिते भवीं भाव ॥ ४ ॥