नादाबिंदा भेटी जे वेळीं प...

नादाबिंदा भेटी जे वेळीं पैं जाली । ऐशी एके बोली बोलती जीव ॥ १ ॥

उगेंचि मोहन धरूनि प्रपंची । त्यासी पै यमाची नगरी आहे ॥ २ ॥

जीव जंतु जड त्यासी उपदेशी । त्यासी गर्भवासीं घाली देवो ॥ ३ ॥

मुक्ताई श्रीहरि उपदेशी निवृत्ति । संसार पुढती नाहीं आम्हां ॥ ४ ॥