मुंगी उडाली आकाशीं । तिणे...

मुंगी उडाली आकाशीं । तिणें गिळीलें सूर्याशीं ॥ १ ॥

थोर नवलाव जाहला । वांझे पुत्र प्रसवला ॥ २ ॥

विंचु पाताळाशी जाय । शेष माथां वंदी पाय ॥ ३ ॥

माशी व्याली घार झाली । देखोन मुक्ताई हांसली ॥ ४ ॥