Bookstruck

चरण मिरवले विटेवरी दोनी ।...

Share on WhatsApp Share on Telegram
Chapter ListNext »

चरण मिरवले विटेवरी दोनी । ध्यातसे ध्यानी सदाशिव ॥१॥

तो हा पंढरीराव कर दोनी कटीं । अभा असे तटीं भीवरेच्या ॥२॥

मुगुट कुंडले श्रीमुख शोभले । ध्यानी मिरवलें योगियांच्या ॥३॥

वंका म्हणे सर्व सिध्दिंचा दातार । भक्तां अभयकर देत असे ॥४॥

Chapter ListNext »