सोयराईनें मनी करोनी विचार...

सोयराईनें मनी करोनी विचार । म्हणे हा अविचार करूं कैसा ॥१॥

हा तंव आहे वृध्द ब्राह्मण । दंत कानहीन दुर्बळ तो ॥२॥

यासी अन्न देतां आपुला विचार । मज मारामार करिती लोक ॥३॥

विन्मुख हा जातां पति रागवेल । बोल हा लागेल कपाळासी ॥४॥

वंका म्हणे ऐसा करोनी निर्धार । ठेवी पायावर डोई तेव्हा ॥५॥