येरी म्हणे मज काय देतां स...

येरी म्हणे मज काय देतां स्वामी । उच्छिष्टांचे आम्ही धणी असों ॥१॥

तुमचे कृपेचा प्रसाद तुम्ही ठेवा । तोचि प्रिय देवा आहे आम्हां ॥२॥

येरु म्हणे घास घेई माझा करीं । मूल तें निर्धारीं होइल तुज ॥३॥

ऐकतां आनंदे घाली लोटांगण । वंदिले चरण जीवेंभावें ॥४॥

वंका म्हणे ऐसें लाघव करोनी । गेलासे निघोनी चक्रपाणी ॥५॥