Bookstruck

संसार दुःखें पीडिलों दाता...

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

संसारदुःखें पीडिलों दातारा । किती येरझारा जन्ममरण ॥१॥

सोडवू गा देवा भवाची काचणी । जातो आडरानी विषयसंगे ॥२॥

भवाचिया डोहीं बुडतों वेळोवेळां । कां न ये कळवळा तुज देवा ॥३॥

वंका म्हणे तुम्ही जरी मोकलिलें । कवणातें वहिलें शरण जाऊं ॥४॥

« PreviousChapter ListNext »