Bookstruck

कासया गा मज घातिलें संसार...

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

कासया गा मज घातिलें संसारा । पाडिलें विसरा तुमच्या नामा ॥१॥

कोठवरी हांव करितों दिवसराती । गुंतलोंसे भ्रांती माया मोहें ॥२॥

न कळे उकला करितां येरझारी । माझा मीच वैरी झालों दिसे ॥३॥

वंका म्हणे सुख संताचे संगती । ती मज विश्रांती द्यावी देवा ॥४॥

« PreviousChapter ListNext »