Bookstruck

नाहीं प्रेमभाव नकळे मान्य...

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

नाहीं प्रेमभाव नकळे मान्यता । सलगी बोलतां सुख वाटे ॥१॥

अखंड नामावळी गाईन वेळोवेळीं । नित्य ती दिवाळी आम्हांघरीं ॥२॥

संतसमागम वैष्णवांचा हाट । पंढरीये पेठ दुमदुमली ॥३॥

वंका म्हणे सुख तयाचे संगंती । बैसेन पंगती हरिदासा ॥४॥

« PreviousChapter ListNext »