Bookstruck

सांवळे सगुण उभे कर कटीं ।...

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

सांवळे सगुण उभे कर कटीं । मूर्ति हे गोमटी बाळरूप ॥१॥

शंख चक्र करी ते कटावरी । पीतांबरधारी चतुर्भुज ॥२॥

लावण्याचा गाभा श्रीमुख चांगले । श्रीवत्स शोभले हृदयावरी ॥३॥

वंका म्हणे धन्य देवांचा हा देव । वैकुंठीचा राव पंढरीये ॥४॥

« PreviousChapter ListNext »