Bookstruck

कोण भाग्य तया सेना न्हावि...

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

कोण भाग्य तया सेना न्हावियाचें । नीच काम त्याचे स्वयें करी ॥१॥

घेउनी धोकटी हजामत करी । आरसा दावी करी बादशहासी ॥२॥

कसबाचे घरी विकीतसे मांस । राका मेहत्यास हुंडी भरी ॥३॥

वंका म्हणे ज्याचे पुराणी पवाडे । तो भक्त सांकडे वारीतसे ॥४॥

« PreviousChapter ListNext »