नकळे वो माव आगमा निगमा । ...

नकळे वो माव आगमा निगमा । जयाचा महिमा श्रुति शास्त्रां ॥१॥

तो म्यां डोळेभरी पाहिला श्रीहरी । भीवरेचे तिरीं विठ्ठलरूप ॥२॥

सुखाचा सागर भक्तांचा कैवारी । ब्रीद चराचरी गाजतसे ॥३॥

वंका म्हणे ऐसा जयाचा महिमा । सुलभ तो आम्हां भाविकांसी ॥४॥