Bookstruck

विठो पंढरीच्या राया । माझ...

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

विठो पंढरीच्या राया । माझें दंडवत पायां ॥१॥

तुझें कृपेचें पोसणें । माझा समाचार घेणें ॥२॥

नाम धारियेलें कंठीं । असे आर्त बहुत पोटीं ॥३॥

माझे अंतरींचें जाणा । तुका म्हणे नारायणा ॥४॥

« PreviousChapter ListNext »