Bookstruck

न वेंचतां मोल आम्ही झालों...

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

न वेंचतां मोल आम्ही झालों दासी । तुम्ही पोसायासी मागें पुढें ॥१॥

नोहे प्रतिपाळ वोपावें परतें । आम्ही एकचित्तें भजों त्यासी ॥२॥

पोटासी घालुनी खरें काम घ्यावें । चुकल्या शिक्षावें यथानीति ॥३॥

स्वामीनीं अंतर केलें तिळभरी । बोल आम्हावरी न ठेवावा ॥४॥

तुका म्हणे आम्ही दासी बाजारणी । ढुंगींचें सोडुनी डोई गुंडों ॥५॥

« PreviousChapter ListNext »