Bookstruck

जें जें लिहिलें संचितीं ।...

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

जें जें लिहिलें संचितीं । तें तें न चुके कल्पांतीं ॥१॥

होणार तें होत आहे । व्यर्थ चिंता करुनी काये ॥२॥

लाभ अथवा हानि । येते घरासी चालोनी ॥३॥

तुका म्हणे स्वस्थ मनें । करा देवाचें चिंतन ॥४॥

« PreviousChapter ListNext »