Bookstruck

तीर्था जाउनियां काय तुवां...

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

तीर्था जाउनियां काय तुवां केलें । चर्म प्रक्षाळिलें वरीवरी ॥१॥

अंतरींचें शुद्ध कासयानें झालें । भूषण त्वां केलें आपणालागीं ॥२॥

वृंदावन फळ घोळिलें शर्करा । भितरील थारा मोडेचिना ॥३॥

तुका म्हणे नाहीं शांति क्षमा दया । तोंवरी कासया फुंदा तुम्ही ॥४॥

« PreviousChapter ListNext »