Bookstruck

झालिया निःशंक फिटला कांसो...

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

झालिया निःशंक फिटला कांसोटा । आतां मणगटा लावा चुना ॥१॥

हाचि नेम आतां न फिरे माघारी । बैसलें शेजारीं गोविंदाच्या ॥२॥

घररिघी झालें पट्टराणी बळें । वरिलें सांवळें परब्रह्म ॥३॥

बळियाचा अंगसंग झाला आतां । रतलें अनंताचिये पायीं ॥४॥

तुका ह्मणे आम्हा नाहीं लाज आतां । भय धाक चिंता........॥५॥

« PreviousChapter ListNext »