Bookstruck

शुद्ध बोजा धान्य आडसुनी ...

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

शुद्ध बोजा धान्य आडसुनी ....। पाखडोनी काढी भूस सर्व ॥१॥

निसोनियां बाई सांडीं सर्व खडे । करुनियां झाडे संचितावे ॥२॥

देउनियां घाव मागतों गोंडाळ । वेंचुनी समूळ रज काढीं ॥३॥

घोळुनियां घोळ ठेवीं एकसवा । सांचुनियां द्यावा घाव त्यासी ॥४॥

आंतील जो कण तयामाजी रेती । वेंचूनी अप्रती त्यागावी ते ॥५॥

तुका म्हणे तेव्हां दळणा सारिला । नाहीं तरी केला लाज फार ॥६॥

« PreviousChapter ListNext »